आश्विन नवरात्रि उत्सव (अशुभनाशिनी नवरात्रि उत्सव) के संदर्भ में सूचना

हरि ॐ,

कोरोना वायरस, “कोविद – १९” की व्यापकता का अंदाज़ा सभी श्रद्धावानों को है ही। आज के इस दौर में श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ बंद होकर, आनेवाली आश्विन नवरात्रि में भी वह बंद ही रहेगा और नवरात्रि का कोई भी कार्यक्रम गुरुक्षेत्रम्‌ में नहीं होगा, इसपर कृपया सभी श्रद्धावान ग़ौर करें।

इस पृष्ठभूमि पर, सद्‍गुरु बापुजी के कहेनुसार, श्रद्धावान इस साल आश्विन नवरात्रि उत्सव (अशुभनाशिनी नवरात्रि उत्सव) में “अंबज्ञ इष्टिका पूजन” ना करें। इससे पूजन की तैयारी के लिए घर से बाहर निकलने की श्रद्धावानों को आवश्यकता ही नहीं होगी। फिर भी जो श्रद्धावान यह नवरात्रि उत्सव मनाना चाहते हैं, वे आश्विन प्रतिपदा के दिन (यानी घटस्थापना के दिन) सुबह सूर्योदय के बाद ‘मोठी आई’ (आदिमाता चण्डिका) की प्रतिमा के सामने दीप प्रज्वलित करें और दूसरे दिन से विजयादशमी तक (यानी दशहरे तक) हररोज़ शाम सूर्यास्त के बाद दीप प्रज्वलित करें (अखंडित रूप में दीप प्रज्वलित करने की आवश्यकता नहीं है)।

इस नवरात्रि उत्सव के दौरान श्रद्धावान मोठी आई तथा सद्‍गुरु अनिरुद्धजी की प्रतिमा के सम्मुख बैठकर प्रायः ग्रंथों का पारायण करें और जितना हो सकें उतना मंत्रगजर और स्तोत्रपठन / मंत्रपठन करें।

———————————————————–

हरि ॐ,

कोरोना वायरस, “कोविद – १९”च्या व्यापकतेचा अंदाज सर्व श्रद्धावानांना आहेच. आताच्या ह्या काळामध्ये श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ बंद असून, येणार्‍या आश्विन नवरात्रीतही ते बंदच राहून नवरात्रीचा कुठलाही कार्यक्रम गुरुक्षेत्रम्‌ मध्ये होणार नाही ह्याची कृपया सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

ह्या पार्श्वभूमीवर, सद्‍गुरु बापूंच्या सांगण्यानुसार श्रद्धावानांनी या वर्षी आश्विन नवरात्रोत्सवात (अशुभनाशिनी नवरात्रोत्सव) “अंबज्ञ इष्टिका पूजन” करू नये. ह्यामुळे पूजनाच्या तयारीसाठी श्रद्धावानांना घराबाहेर पडण्याची आवश्यकताच राहणार नाही. तरीही जे श्रद्धावान हा नवरात्रोत्सव साजरा करू इच्छितात, त्यांनी आश्विन प्रतिपदेच्या दिवशी (म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी) सकाळी सूर्योदयानंतर मोठी आईच्या प्रतिमेसमोर दीप लावावा व दुसर्‍या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत (म्हणजेच दसर्‍यापर्यंत) दररोज सायंकाळी सूर्यास्तानंतर दीप लावावा (अखंड दीप लावण्याची आवश्यकता नाही).

ह्या नवरात्रोत्सवाच्या काळात श्रद्धावानांनी मोठी आई व सद्‍गुरु अनिरुद्धांच्या प्रतिमेसमोर बसून शक्यतो ग्रंथांचे पारायण करावे व जमेल तसे मंत्र गजर तसेच स्तोत्रपठण / मंत्रपठण करावे.

।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध् ।।

Related Post

Leave a Reply