अनिरुद्ध परेड ( Aniruddha Parade )

ll हरि ॐ ll
रम पूज्य बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितलेल्या भक्तीमय सेवांपैकी असलेल्या अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा ’अनिरुद्ध परेड प्रोजेक्ट’ हा एक अविभाज्य घटक आहे.  भक्तीच्या वटवृक्षातून अनेक सेवांच्या पारंब्या फुटल्या आणि त्या प्रत्येकाचा एक वेगळा वटवृक्ष तयार झाला. त्यातील एक वटवृक्ष म्हणजेच अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि या वटवृक्षाची एक पारंबी....भक्तीची कास धरुन असलेली पारंबी म्हणजेच अनिरुद्ध परेड प्रोजेक्ट.
अनिरुद्ध परेड, गुरुक्षेत्रम, स्वातंत्र्य दिन, independence, patriotism, patriot, flag, अनिरुद्ध परेड पथक, Aniruddha bapu, Aniruddha's Academy of Disaster Management, AADM, bapu,अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, aniruddha, happy home, Gurukshetram, Shree Aniruddha Gurukshetram, अनिरुद्ध परेड, सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र पुणे, रत्नागिरी
कुठलेही कार्य यशस्वीरित्या करावयाचे असल्यास काही गुणधर्म आवश्यक असतात. मग हे कार्य डिझास्टर मॅनेजमेंटचे असो किंवा आणखी कुठलेही. भौतिक पातळीवर बघायचे झाल्यास परेडमुळे पुढील फायदे होतात. शिस्त लागते, स्टॅमिना, आत्मविश्वास, ऍक्टीव्हनेस, संयम वाढतो, निडरता, सभानता वाढते, कार्यक्षमता, एकाग्रता, निरिक्षण क्षमता वाढते आणि नीट विचार केला तर लक्षात येईल हे सारे गुणधर्म भक्ती वाढविण्यासाठी व म्हणूनच सदगुरुचरणी दृढ होण्यासाठी आवश्यक आहेतच. पण हे सारे गुणधर्म माझ्यात तेव्हाच उतरतात जेव्हा माझ्यात नियमितता हा मुलभूत गुणधर्म असतो व हा गुणधर्म आळसाला दूर केल्याने आपोआप वाढत राहतो. परेडची ओढ आळस दूर करतेच. 
परेडमधले नियमन, नियमितता हे भक्ती मार्गातील नियमनापेक्षा काही वेगळे नाही. मुळातच ए.ए.डी.म परेड भक्तीमार्गापेक्षा वेगळी नाही. कारण ती एक भक्तिमय सेवाच आहे.
हेमाडपंत या नियमनाचे महत्व पटवून देताना सांगतात,
नियमन म्हणजे नियमें वाचन । न होतां संपूर्ण निश्चिंत परिशीलन । 
अपुरे टाकूनी नियमितोपासन ।स्थानापासून चळूं नये ॥७९॥
आणि हे नियमन हा नियमितपणा परेडमध्ये आहेच मात्र तो माझ्यात उतरला पाहिजे आणि म्हणूनच ए.ए.डी.म च्या डी.एम.व्हीज साठी नियमीत पठण आणि नियमीत परेडला जाण यात काहीच फरक नाही.
अनिरुद्ध परेड, गुरुक्षेत्रम, स्वातंत्र्य दिन, independence, patriotism, patriot, flag, अनिरुद्ध परेड पथक, Aniruddha bapu, Aniruddha's Academy of Disaster Management, AADM, bapu,अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, aniruddha, happy home, Gurukshetram, Shree Aniruddha Gurukshetram, अनिरुद्ध परेड, सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र पुणे, रत्नागिरी
आज भारताचा ६६वा स्वातंत्र्य दिन आहे...आणि अनिरुद्ध परेड पथक श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम, सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, पुणे आणि सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, रत्नागिरी येथे मानवंदना देणार आहे.  गुरुक्षेत्रमसह अनेक उपासना केंद्रावर भारताच्या राष्ट्रध्वजाला मानवन्दना दिली जाईल, पण हे सर्व करत असताना या देशाच्या स्वातंत्र्याकरीता ज्या अनेक देश भक्तांनी बलीदान केले त्यांचे स्मरण व्हायला हवे; त्याची जाणीव असायला हवी व त्याच बरोबर आम्हाला आमच्यावर येउ घातलेल्या जबाबदारीची जाणीवही असायला हवी.
ll हरि ॐ ll