बापूंच्या संकल्पनेतून साकार झालेले गोविद्यापीठम् व त्याच गोविद्यापीठम् मध्ये चालणारे AIGVचे अफाट कार्य आज समस्त शेतकर्यांसाठी तसेच इतर श्रद्धावानांसाठीही प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरत आहे.
____________________________________________________________________________________________________
वर्षानुवर्षे रासायनिक खतांचा मारा करून सोन्यासारख्या जमिनीची खर्या अर्थाने माती झालेली असताना, येत्या काळात सेंद्रिय शेतीच शेतकऱ्याला वरदान ठरणार आहे हे निर्विवाद सत्य आहे.
____________________________________________________________________________________________________
हायड्रोपोनिक्स तंत्रातून १ कि. मक्याच्या बियांपासून 8 ते 9 कि. चारा अवघ्या सात दिवसांत तयार करता येतो आणि तयार केलेला चारा हा गुरांना अत्यंत आवश्यक खुराक पुरवतो.
____________________________________________________________________________________________________
हायड्रोपोनिक्स ह्या प्रगत तंत्राचा वापर करण्यासाठी इतरत्र लाखो रूपयांचे सेटअप लावले जात असताना, आपण गोविद्यापीठम्मध्ये काही हजारांमध्ये तेच तंत्रज्ञान यशस्वीपणे राबविले आहे.
____________________________________________________________________________________________________
पदरचे पैसे खर्च करून, बियाणे आणि खत विकत घेऊन, तात्पुरत्या फायद्यासाठी जमीन वैराण करण्यापेक्षा वेळीच सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आज काळाची गरज आहे.