Home / Marathi / नवरात्रि- पूजन – आदिमाता दुर्गा व भक्तमाता पार्वतीचे एकत्रित पूजन
नवरात्रि- पूजन – आदिमाता दुर्गा व भक्तमाता पार्वतीचे एकत्रित पूजन

नवरात्रि- पूजन – आदिमाता दुर्गा व भक्तमाता पार्वतीचे एकत्रित पूजन

भाग १ भाग २ हिंदी

सध्या सुरु असलेल्या आश्विन नवरात्रोत्सवापासून, परमपूज्य सद्‍गुरु बापूंनी नवरात्रीपूजनाची शुद्ध, सात्त्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम्‌ पवित्र पद्धती सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देऊन अत्यंत कृतार्थ केले आहे. ह्या उत्सवानिमित्त, अनेक श्रद्धावानांनी त्यांच्या घरी अत्यंत भक्तीमय व उत्साही वातावरणात सुरु असलेल्या ह्या पूजनाचे, आकर्षक व प्रासादिक सजावटीसहित काढलेले फोटो, “नवरात्रीपूजन” या शीर्षकांतर्गत खास उघडलेल्या फेसबुकपेजवर पोस्ट केले आहेत. अशा ह्या विशेष नवरात्रीपूजनासंदर्भात, दैनिक प्रत्यक्षमध्ये रविवार, दि. १३ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात सद्गुरू बापूंनी दिलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा उल्लेख मला इथे आवर्जून करावासा वाटतो.

———–

ह्या अग्रलेखामध्ये दिल्याप्रमाणे, “श्रीशांभवीविद्येच्या” पहिल्या कक्षेचा महिमा वर्णन करताना देवर्षी नारद भक्तमाता पार्वतीस उद्देशून म्हणतात,

“हे पार्वती! तू आदिमातेची अशी विलक्षण कन्या आहेस की जिच्या प्रत्येक कृतीमध्ये “शांभवीविद्या” हाच एकमेव मार्ग असतो व ह्यामुळेच तुझीच ह्या शांभवीविद्येच्या तपश्चर्येतील नऊ रूपे नवदुर्गा म्हणून प्रसिद्ध आहेत. १) शैलपुत्री, २) ब्रह्मचारिणी, ३) चंद्रघण्टा, ४) कूष्मांडा, ५) स्कंदमाता, ६) कात्यायनी, ७) कालरात्री, ८) महागौरी, ९) सिद्धिदात्री”.

त्यानंतर सर्व ऋषिवृंदाकडे वळून देवर्षि नारद म्हणाले, “पार्वतीच्या ह्या नऊ रूपांचे पूजन नवरात्रींमध्ये क्रमाने एक एक दिवशी केले जाते.

कारण ज्याप्रमाणे “श्रीसूक्त” हे भक्तमाता लक्ष्मी व आदिमाता महालक्ष्मी ह्यांचे एकत्रित स्तोत्र आहे, त्याचप्रमाणे “नवरात्रीपूजन” हे भक्तमाता पार्वतीचे व आदिमाता दुर्गेचे एकत्रित पूजन आहे.” 

———–

अशा ह्या भक्तमाता पार्वतीच्या, “नवदुर्गा” म्हणून प्रसिद्ध असलेल्या, शांभवीविद्येच्या तपश्चर्येतील नऊ रूपांची चित्र मी श्रद्धावानांच्या संदर्भाकरिता खाली देत आहे.

       

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सध्या श्रद्धावानांच्या घरी सुरु असलेल्या नवरात्रीपूजनाच्या विशेष पद्धतीचा लाभ घेताना, वरील अग्रलेखाच्या स्मृती व “नवदुर्गा”च्या चित्रांचे दर्शन, श्रद्धावानांचा आनंद नक्कीच द्विगुणीत करेल ह्याची मला खात्री आहे.

हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।

हिंदी    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*